मनसेला धक्का, शिशिर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

मनसेचा आणखी एक मासा शिवसेनेच्या गळाला

Updated: Jun 19, 2018, 04:43 PM IST

मुंबई : मनसेचा आणखी एक मासा शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी शिशिर शिंदे यांना शिवबंधन बांधण्यात आलं. शिशिर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. मनसेनं सोमवारीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीतूनही शिशिर शिंदेना डच्चू देण्यात आला होता.