शिवसेनेची स्वबळावर सत्ता हेच ध्येय; आदित्य ठाकरेंचा पुनरूच्चार

...

Updated: Jun 19, 2018, 01:44 PM IST
शिवसेनेची  स्वबळावर सत्ता हेच ध्येय; आदित्य ठाकरेंचा पुनरूच्चार title=

मुंबई: स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार आज (मंगळवार,१९ जून) शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेनेच्या ५२व्या वर्धापनदिनानिमित्त  गोरेगावच्या एनएससी मैदानात शिवसैनिकांच्या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाशिबिराच्या उद्घाटनाचं मार्गदर्शन आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांसमोर आपले विचार व्यक्त केले .यावेळी आदित्य ठाकरेंनी स्वबळाचा पुनरुच्चार केला. आज दिवसभर या महाशिबिरात वेगवेगळ्या परिसंवादांचं आयोजन करण्यात आलंय. 

एक हाती सत्ता 

शिवसेनेचा ५२व्या वर्धापनदिन सोहळा सुरु झालाय. यानिमित्तानं राज्यभरातल्या शिवसेनेच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्याच्या महाशिबिराला आज मुंबईतल्या गोरेगावमधील एनएससी मैदानात आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनानं सुरुवात झालीय.....स्वबळावर लढायचं आणि एक हाती सत्ता आणायची हेच आपलं ध्येय असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

शाहांच्या 'मातोश्री'भेटीचा तपशील उलघडणार?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या 'मातोश्री' वारीच्या पार्श्वभूमीवर आज पार पडत असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला वेगळं महत्व प्राप्त झालंय... पक्षाच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल.