मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना 'कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडी-भायखळा विधानसभा तसेच एकलव्य फाउंडेशन अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
पूरग्रस्तांना प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या, भांडी, पाण्याच्या बाटल्या अशा कुटुंबाला जीवनउपयोगी वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जमेल तेवढी मदत करण्याचे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.