देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी- मुंबई | Avinash Jadhav ban in Mumbra : मनसे विरोधात काल रात्री अचानक हजारोंचा जमाव मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर जमा झाला. (Citizens aggressive against MNS in Mumbra) मनसेच्या स्थानिक नेत्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. रमझानच्या काळात मनसे स्थानिक नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले. (MNS Leader Avinash Jadhav ban in Mumbra by Thane Police) तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी मुंब्रा प्रवेशबंदी लागू केली.
कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून कलम 144 चे आदेशही लागू केले. पोलिसांकडून मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मुंब्र्यासारख्या संवेदनशील भागात शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन केले आहे. तसेच जर कोणी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्रा पोलिसांनी 9 एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी लागू केली अविनाश जाधव यांना तणावाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश ठाणे पोलिसांनी काढले आहेत. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरातील अनधिकृत मशिदींचा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सध्या रमजानचा महिना सुरु आहे मुंब्रा संवेदनशील विभाग आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे पोलिसांनी अविनाश जाधव यांना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश बंदी केली आहे.