धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, आमचं रेल्वे इंजिन सुसाट...

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यावर मनसेने ही आता टीका केली आहे.

Updated: Oct 8, 2022, 10:34 PM IST
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, आमचं रेल्वे इंजिन सुसाट... title=

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. दुसरीकडे त्यांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यापुढचं आव्हान वाढलं आहे. यावरुन मनसेने शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत यावर टीका केली आहे.

चिन्हं बदलत, कुणाची गोठतात आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतंय. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमेर खोपकर यांनी दिली आहे.