मुंबई : देशभर मुसलमानांनी जे मोर्चे काढले त्याचा मला अर्थ लागला नाही. कायद्यातच तसं नव्हतं मग ताकद कुणाला दाखवली ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सीएए, एनआसी असेल जे जन्मापासून इथ होते त्यांना कोण बाहेर काढणार होते ? असे देखील त्यांनी विचारले. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिल्याचेही ते यावेळी म्हणाले.
हिंदु बंधू मातांनो आणि भगिनींनो म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशातून हाकललंच पाहिजे. पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगाणीस्तान इथे धार्मिक अत्याचार होतील त्यांना भारत नागरिकत्व देईल असा कायदा आहे, तो 1955 सालचा कायदा असल्याचेही ते म्हणाले. 1955 सालची स्थिती वेगळी होती आज वेगळी आहे.
केंद्र सरकारवर टीका केली की हे भाजपा विरोधीचांगले काम केले स्तुती केली तर ते भाजपाच्या बाजूने म्हणतात. यात मध्ये काही आहे की नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
भारतात १३५ कोटी लोकसंख्या, त्याला आकार नाही, मात्र, धार्मिक अत्याचार झाल्यावर तुम्हाला आश्रय द्यावा लागतो. सीएए मध्ये गैर काय आहे ? असे म्हणत एनआरसी, माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली काय या लोकांना देशात अनेक समस्या आहेत. मला माहिती आहे, मात्र, घुसखोरांची समस्याही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.