Raj Thackeray | कार्यकर्त्यांच्या हाताला सूज, राज ठाकरेनी लावलं मलम

 या व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray ) यांचा हा कार्यकर्ता (Manoj Chvan) साहेब हात खूप दुखतोय असं सांगत आहे.  

Updated: Dec 23, 2021, 07:02 PM IST
Raj Thackeray  | कार्यकर्त्यांच्या हाताला सूज, राज ठाकरेनी लावलं मलम title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) आपल्या रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांचे भाषण ऐकायलाही तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करत असते. त्यांचे रोखठोक बोलणे ऐकून त्यांच्याविषयी अनेक गैरसमजही पसरलेले दिसतात. परंतु, हेच रोखठोक राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांची कशी काळजी घेतात हे दाखविणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. (MNS Chief  Raj Thackeray with his Incumbent manoj chavan)

या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांचा हा कार्यकर्ता साहेब हात खूप दुखतोय असं सांगत आहे. यावर राज ठाकरे थांब जरा असं म्हणत त्याच्या दुखऱ्या हाताला मलम लावताना दिसत आहेत. मनसे ठाणे पालघरचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आपल्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या दरम्यान हा किस्सा घडला आहे. 

हा कार्यकर्ता आहे मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. त्यावेळेपासून मनॊज चव्हाण हे राज ठाकरे यांच्या सावलीसारखे सोबत आहेत. शिवतीर्थ येथे कार्यकर्त्यांची भेट होणार होती. यावेळी मनोज चव्हाण यांची त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी साहेब हात खूप दुखतोय, असं सांगितलं.

यावर राज ठाकरे यांनी थांब जरा असे म्हणत त्यांच्या दुखऱ्या हाताला मलम लावलं. अविनाश जाधव यांनी हा व्हिडीओ शेअर केला. शिवाय आम्ही राज यांना देव का मानतो, याचा खुलासाही केला आहे.