मुंबई : राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Tested Corona Positive) यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. राज ठाकरे यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. (mns chief raj thackeray tested corona positive surgery postponed)
राज ठाकरे यांच्या पायावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उद्या 1 जूनला शस्त्रक्रिया पार पडणार होती. मात्र कोविड डेड सेलमुळे ॲनेस्थेशिया देऊ शकत नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरे रूग्णालयातून घरी परतले आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे मनसेप्रमुखांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही राज यांना कोरोना झाला होता. राज यांना याआधी 23 ऑक्टोबर 2021 ला पहिल्यांदा कोरोना झाला होता.
दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 711 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 506 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गंभीर बाब म्हणजे राज्यात कोरोनानं एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.