मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. 

Updated: Jun 23, 2020, 09:58 AM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत. 

'मुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल'

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सोमवारी दादरमध्ये १६ तर माहीममध्ये कोरोनाचे २१ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे या परिसरात पालिकेकडून अजूनही खबरदारी घेतली जात आहे. 

Covid-19 : मुंबई महापालिकेचं आता "मिशन झिरो"

 

शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव
शिवसेना भवनात नेहमी ये-जा असणाऱ्या खासदार अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळत आहे. सोमवारी या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर संपूर्ण सेनाभवन सॅनिटाईझ करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार आहे.