'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे: राज ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे  - राज ठाकरे

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 18, 2018, 10:31 PM IST
'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे:  राज ठाकरे title=

मुंबई : देशासमोरील भविष्यातील धोके टाळायचे असतील तर, मोदीमुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

भाजप सरकारवर सडकून टीका

गुडीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे रविवारी बोलत होते. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांच्यापर्यंत सर्वच जण राज ठाकरे यांच्या रडारवर होते. राज ठाकरे यांनी अनेक बॅंकांना चुना लाऊन देशाबहेर पळणाऱ्या उद्योगपती आणि त्यांचे सरकार, राजकीय नेते, मंत्री यांच्यासोबत असलेल्या कथीत संबंधांवरही जोरदार प्रहार केला. 

शिवसेना आणि इतर कोणत्याच पक्षावर अवाक्षरही नाही

राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात आज शिवसेना इतर कोणत्याच पक्षाचा उल्लेख झाला नाही. अपवाद फक्त भाजपचा. राज ठाकरे यांचे आजचे संपूर्ण भाषण हे भाजप, केंद्र सरकार यांच्या धोरणावर होते. भाजप प्रणीत सरकारव टीका करताना राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्द वापरले. आता पर्यंत भारताला दोन वेळा स्वातंत्र्य मिळालं. पहिले १९४७, दुसरे १९७७ला आता २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज निर्माण झाली आहे.

मोदीमुक्त भारताची गरज

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अश्वासनांवर विश्वास ठेऊन लोकांनी यांना दिली. यांनी भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे अवाहन केले. लोकांनीही यांच्यावर विश्वास ठेवला. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची धोरणे पाहता मोदीमुक्त भारताची गरज निर्माण झाली आहे. हे दिसतं तितकं साध सोप प्रकरण नाही. २०१९ मध्ये मोदीमुक्त भारत निर्माण करणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्तवाचे मुद्दे

  • मुंबई | भविष्यात सत्तापरिवर्तन झाले आणि नोटबंदीची चौकशी झाली तर,या देशातील १९४७ नंतरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर येईल - राज ठाकरे 
  • मुंबई | नरेंद्र मोदींनी जगभर फिरून एक पैसाही आणला नाही - राज ठाकरे 
  • मुंबई | भारताला झालेला भाजप, मोदी आजार दूर करण्यासाठी सर्व पक्षांणी एकत्र या - राज ठाकरे 
  • मुंबई | वडापाव विकणे हा जर रोजगार असेल तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर काय वड्यासाठी पिठ मागयाला फिरत आहेत काय ? -  राज ठाकरे 
  • मुंबई | मोदीमुक्त भारत व्हायला हवा -  राज ठाकरे 
  • मुंबई | आतापर्यंत भारताला दोन वेळा स्वातंत्र्य मिळालं. पहिलं १९४७ दुसरं १९७७ला आता तिसरं २०१९ला मिळालं पाहिजे - राज ठाकरे 
  • मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यांवर दंगली घडवल्या जातील - राज ठाकरेंचा आरोप 
  • मुंबई | बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांचे मोहोल्ले उभे केले जात आहेत. ते खोटेच जाळले जात आहेत. पुढे त्यावर पक्की घरे, इमारती उभा केली जात आहेत - राज ठाकरे 
  • मुंबई | निवडणुकांसाठी भविष्यात जातीय, धार्मिक दंगली घडवल्या जातील - राज ठाकरे 
  • मुंबई | महाराष्ट्रातील (मुंबई) कार्यालये गुजरातला पळवली जातायत. त्यामुळे मराठी माणसांच्या नोकऱ्या हिराऊन घेेतल्या जातायत - राज ठाकरे 
  • मुंबई | नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा - राज ठाकरे 
  • मुंबई | पंतप्रधान झाल्यावरही मोदींना गुजरातचेच प्रेम  अधिक - राज ठाकरे 
  • मुंबई | राफेल विमानाच्या खरेदीबाबत सोईस्कर मौन बाळगले जात आहेत - राज ठाकरे 
  • मुंबई | सध्याच्या सरकारमध्ये बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा झाला आहे. पण, त्याच्या बातम्या बाहेर येत नाहीत - राज ठाकरे
  • मुंबई | राज्यत सध्या सत्तेवर असलेलेल मुख्यमंत्री हे बसवलेले- राज ठाकरे 
  • मुंबई | महाराष्ट्रात रोजगार आहे. पण, आम्ही आरक्षणासाठी भांडतोय. परप्रांतिय आमचे रोजगार पळवून नेतायत - राज ठाकरे 
  • मुंबई | आमचे मराठी लोकच चिरीमिरी घेत आहेत. त्यामुळे परप्रांतियांचे फावते आहे. - राज ठाकरे 
  • मुंबई | राज्यात दलाल राज्य करत आहेत - राज ठाकरे 
  • मुंबई | मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. सरकारने चांगले काम केले तर कौतुक करेन - राज ठाकरे 
  • मुंबई | पैसे नसताना नितिन गडकरी कोट्यवधींच्या गोष्टी करतात  - राज ठाकरे 
  • मुंबई | अक्षय कुमार हा भारतात जन्मलेला पण कॅनडाचा नागरिक असलेला अभिनेता - राज ठाकरे 
  • मुंबई | यापुढे प्रत्येक वर्षी गुडीपाडव्याला मेळावा होणार - राज ठाकरे 
  • मुंबई | सरकारच्या बाजूने बातम्या नाही दिल्या तर, जाहीराती बंद करू. सरकारची (मोदी, अमित शहा) प्रसारमाध्यमांना धमकी - राज ठाकरे 
  • मुंबई | प्रसारमाध्यमांतून बातम्या काय द्यायच्या हे सरकार सांगते - राज ठाकरे 
  • मुंबई | अभिनेत्री श्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळणे ही महाराष्ट्र सरकारची चूक - राज ठाकरे 
  • मुंबई | मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे वर्गातला मॉनिटर, जो शिक्षिकांना आवडतो पण, विद्यार्थ्यांना नाही - राज ठाकरे
  • मुंबई | अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणजे शोलेतला सांबा आणि रजनीकांतचा बारावा डमी - राज ठाकरे 
  • मुंबई | ज्यांना मनसे पक्ष संपला त्यांनी ही गर्दी पहा आणि ठरवा