मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून 'झी चोवीस तास' या वृत्तवाहिनीवर बंदी घातलीय. पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यापुढे 'झी चोवीस तास'शी संपर्क वा संवाद ठेवू नयेत असे आदेश त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे काढलेत.