विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

विश्वसुंदरीचा किताब मिळाल्यानंतर रविवारी मानुषी मुंबईत परतली, त्यावेळी तिच्या स्वागताला मोठी गर्दी झाली होती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 01:16 PM IST
विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला title=

मुंबई : विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिनं आज सकाळी प्रभादेवीतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. विश्वसुंदरीचा किताब मिळाल्यानंतर रविवारी मानुषी मुंबईत परतली, त्यावेळी तिच्या स्वागताला मोठी गर्दी झाली होती. 

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

आज मानुषी सकाळीच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली, यावेळी तिचे आई वडीलही तिच्याबरोबर होते. विशेष म्हणजे विश्वसुंदरी स्पर्धेसाठी चीनला जाण्याआधीही मानुषीनं सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते. त्यामुळे विश्वसुंदरी झाल्यावरही तिनं आवर्जून गणपतीचं दर्शन घेतलं. 

देशाच्या नागरिकांचे आभार

या स्पर्धेतल्या यशानंतर कोट्यवधी भारतीयांनी मानुषीचं अभिनंदन केलंय आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्तानं मानुषीनं भारतीय नागरिकांचेही आभार मानले आहेत.