कोल्हापूरच्या पूरस्थितीचा भेसळ माफियांकडून गैरफायदा, भेसळयुक्त दुधाची विक्री

पूरपरिस्थितीमुळे मुंबईला कमी प्रमाणात दूध पुरवठा होत आहे, याचाच फायदा भेसळखोरांनी घेतला आहे 

Updated: Jul 26, 2021, 06:21 PM IST
कोल्हापूरच्या पूरस्थितीचा भेसळ माफियांकडून गैरफायदा, भेसळयुक्त दुधाची विक्री title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठ्यावर झाला आहे. पूरपरिस्थितीमुळे मुंबईला कमी प्रमाणात दूध पुरवठा होत असून याचाच फायदा भेसळखोरांनी घेतला आहे. 

मुंबईच्या मालाड आणि गोवंडी भागात एफडीएनं धाड टाकून दुधात पाणी आणि भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मालाडमध्ये 88 लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं आहे. तर गोवंडीतल्या दूध डेअरीत टँकरचं पाणी मिसळलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएनं छापा घातला. या भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

दुधाची भेसळ करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत मालाड आणि गोवंडी भागात कारवाई केली आहे. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. तर तब्बल 88 लिटरपेक्षा जास्त दूध जप्त करण्यात आलं आहे. तर गोवंडी इथल्या दूध डेरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याता आले आहेत. 

महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत कमी येणाऱ्या दूध साठयामुळे भेसळीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झालं आहे. भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर आहे