मुंबई : दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी अनेकजण आपलं नशीब आजमावतात. मुंबईकरांनाही प्रतिक्षा असलेल्या या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची तारीख ठरलेली नसली तरीही यंदा सुमारे एक हजार घरांसाठी लॉटरी निघेल असे सांगण्यात आले आहे.
यंदा म्हाडा घरांच्या लॉटरीमध्ये सुमारे 500 घरं ही अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवली जाणार आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी २८३ आणि अल्प उत्पन्न गटासाठी ५०० घरे राखून ठेवल्याने सर्वसामन्यांचे म्हाडा घरांसाठीचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढणार आहे.
म्हाडा लॉटरीसाठी यंदा मुख्यालयात मंडप उभारून लॉटरी जाहीर केली जाईल सोबतच या सोहळ्याचे फेसबुक लाईव्हदेखील होणार आहे. फेसबुक लाईव्हवर म्हाडाची लॉटरी लाईव्ह होत असल्याने गर्दी आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.
म्हाडा घरांची लॉटरी दरवर्षी मे महिन्यात काढली जाते. यंदा मे महिन्यात लॉटरी काढली जाण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटलं जात आहे. मागील वर्षी १० नोव्हेंबरला लॉटरी काढली होती. त्यावेळी फक्त ८१९ घरांचा लॉटरीत समावेश होता.
एकूण घरे - ५००
पीएमजीपी मानखुर्द - ११४ , मुलुंड गव्हाणपाडा- २६९ ,सायन प्रतीक्षानगर- ८४, गोरेगाव सिद्धार्थनगर- २४, घाटकोपर पंतनगर-२, विक्रोळी टागोरनगर- ७
एकूण- २८३
वडाळा अँटॉप हिल- २७८ आणि म्हाडा इमारत घरदुरुस्ती मंडळ- ५
एकूण २१६
विक्रोळी कन्नमवार नगर- २८ ,कांदिवली महावीर नगर- १७२, मानखुर्द- पीएमजीपी १६
घाटकोपर पंतनगर - २