Mhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे. 

Updated: Dec 27, 2022, 09:28 AM IST
Mhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी  title=
Mhada housing lottery new rules read details

Mhada Lottery New Rules : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये (New Year 2023) नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे. म्हाडाच्या ( Mhada Lottery 2023) घरांच्या सोडतीसाठी 2023 मध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी नोंदणीला (Mhada lottery Registration) सुरुवात होणार आहे. ही नोंदणी आता एकदाच करावी लागणार आहे. ती पुढे कायमस्वरुपी राहणार असून, ही नोंदणी कायमस्वरूपी या नोंदणी क्रमांकाच्या मदतीनं इच्छुक उमेदवार भविष्यात कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करु शकणार आहेत. 

म्हाडा सोडतीत होणारा मानवी हस्तक्षेप टाळून अधिक पारदर्शक मार्गाचा अवलंब करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी आणि निवड प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ही नोंदणी करताना इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रं जोडावी लागणार आहेत. (Mhada Lottery process)

एकदा नोंदणी करा आणि चिंतामुक्त व्हा... (Mhada Lottery registration)

म्हाडासाठी एकदा नोंदणी केल्यानंतर नोंदणीधारक मुंबई (Mhada Lottery Mumbai), कोकण मंडळ (Mhada Lottery Konkan) किंवा इतर कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी सहजपणे अर्ज करु शकणार आहेत. यासाठी नोंदणीधारकाला दर पाच वर्षांनी निवासाचा दाखला सादर करावा लागणार आहे. तर प्रतिवर्षी उत्पन्नाचा दाखला आणि आयकर विवकरण पत्रही सादर करावं लागणार आहे. 

कधी सुरु होणार नोंदणी प्रक्रिया ? (Mhada Lottery registration process)

म्हाडातर्फे नव्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नोंदणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. सोडतीसाठी वापरात असणाऱ्या अॅपवरून ही नोंदणी करता येणार आहे. यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला , उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन सादर करावी लागतील. यामध्ये आरक्षित वर्गांसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्यांच्या प्रमाणपत्राचा नमुना म्हाडाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं

 

एका दिवसात मिळणार घराची चावी... 

म्हाडाकडून करण्यात आलेल्या नव्या बदलांनुसार अर्जदाराची आधीच पात्रता आधीच निश्चित केली गेल्यामुळं सोडतीत नाव आलेल्या विजेत्यांना तात्काळ देकार पत्र मिळेल. ज्यानंतर ज्यांना घराची संपूर्ण रक्कम भरणं शक्य आहे अशांना एका दिवसात घराची चावी मिळणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, फक्त घराची चावी आणि कराराच्या कारणानंच इच्छुकांना म्हाडाच्या कार्यालयात जावं लागणार आहे. 

तगादा संपला... 

यापूर्वी म्हाडाच्या सोडत प्रक्रियेनंतर विजेत्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी म्हाडा कार्यालयात जाणं भाग होतं. तिथं कागदपत्र पुढे पाठत असताना अनेक खाचखळगे निर्माण होत असल्यामुळं सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पण, आता मात्र हा तगादा संपणार असून शक्य सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे.