रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Sep 9, 2018, 09:43 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक  title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर चालतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

दुरुस्तीचे काम 

दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी १०. ३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या दुरुस्तीची काम करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन धीमी मार्गावरील लोकलची वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.