Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!

Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या  उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Nov 3, 2023, 09:08 PM IST
Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक! title=
Mumbai News, Megablock

Megablock Western Railway : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या  उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. माटुंगा आणि भायखळा दरम्यान दि. ०४ आणि ०५ नोव्हेंबर (शनिवार/रविवार रात्रीची वेळ) रोजी ००.३५  ते ०४.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्ग

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दुहेरी थांबा घेतील तसेच नियोजित आगमनापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ब्लॉक कालावधीत डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दुहेरी थांबा घेतील आणि इगतपुरी, लोणावळा आणि रोहा येथे वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत  पनवेल/बेलापूर करीता सुटणारी आणि बेलापूर येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत सुटणाऱ्या व  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -कुर्ला सेक्शनवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील

ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.