दर रविवारप्रमाणे याही रविवारी (7 मार्च) मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉकचं काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवर कुठे असेल मेगाब्लॉक?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
छशिमट इथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छशिमट ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जाणार.
या लोकल मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. विद्याविहार इथून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
घाटकोपर इथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद या स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉककाळात मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत.
हार्बर रेल्वे मार्गावर कुठे मेगाब्लॉक?
कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गादरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा, तसंच छशिमटसाठी पनवेल/बेलापूर/वाशी इथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक?
पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.