मुंबई: लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

नियोजन न करता घराबाहेर पडाल तर, पस्तवाल. तुमचा खूप वेळ रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहण्यात जाऊ शकतो. 

अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 12, 2018, 09:00 AM IST
मुंबई: लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक title=
(फाइल फोटो)

मुंबई: आज रविवार. आठवडाभर धावपळीत असलेल्या मुंबईकरांसाठी हक्काच्या सुट्टीचा दिवस. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर, ही बातमी पूर्ण वाचा. नियोजन न करता घराबाहेर पडाल तर, पस्तवाल. तुमचा खूप वेळ रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहण्यात जाऊ शकतो. कारण, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज नेहमीप्रमाणेच मेगाब्लॉक आहे. त्यामुळे रेल्वेचे आजचे वेळापत्रक जाणून घ्या.

कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक कुठे, कसा व किती वेळ?

मध्य रेल्वे

कुठून कुठं पर्यंत? - मुलूंड ते माटूंगा (अप)
किती ते किती? - सकाळी ११ वाजून ५ मिनिटे ते दुपारी ४ वाजून १५ मिनिटे.
बदल काय? - उपनगरीय लोकलसह सर्व मेल-एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल फेऱ्या २० मनिटे उशीराने

हार्बर रेल्वे

कुठून कुठं पर्यंत? -  कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
किती ते किती? - सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत (६ तास)
बदल काय? - ब्लॉक काळात वाशी-बेलापूर-पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द. प्रवाशांच्या सुविधेसाठी या मार्गावर विशेष लोकल. हार्बरवरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा.

पश्चिम रेल्वे

कुठून कुठं पर्यंत? - चर्चगेट व मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर 
किती ते किती? -   सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
बदल काय? - ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील.