मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर आज तसंच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2018, 08:01 AM IST
मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक  title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज तसंच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री 12.30 ते रविवारी पहाटे साडेचारपर्यंत मेगाब्लॉक असेल. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

 या कालावधीत वसई ते विरार स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवली जाईल. दुसरीकडे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर तसंच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.