मुंबईत रविवारी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक, रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंत

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  मात्र, मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. 

Updated: Aug 30, 2019, 09:16 PM IST
मुंबईत रविवारी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक, रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंत title=
संग्रहित छाया

मुंबई : अनेक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉग घेण्यात येतो. रविवार १ सप्टेंबर रोजीचा पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  मात्र, मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. मात्र गणेशोत्सवाचा काळातील गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात निर्णय घेतला आहे.  मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड  माटुंगा अप जलद, तर हार्बरवर पनवेल -वाशी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे : 

मुलुंड-माटुंगा स्थानकादरम्यान सीएसएमटीच्या दिशेला अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दु. ३.४५  वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे  मुलुंड-माटुंगा दरम्यान सर्व अप जलद लोकल अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मेल/एक्सप्रेस आणि लोकल सुमारे २० मिनिटे उशिरा धावणार आहेत. 

तसेच दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून याच स्थानकातून पुन्हा पॅसेंजर रवाना होईल. यासाठी दुपारी ३.४० वाजता दादरहून विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. गणपतीसाठी गावी  जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही विशेष गाडी असणार आहे.

हार्बर रेल्वे : 

 पनवेल ते वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते ४.०१ वाजेपर्यंत सीएसएमटी ते पनवेल/ बेलापूर, पनवेल-अंधेरी  या अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ट्रान्स हार्बरहून  ठाणे- वाशी/ नेरुळ प्रवास करू शकतात, असे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.