रविवारी असा राहील रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचं मेगाब्लॉकची माहिती जाणून घ्या... आणि मगच तुमचा फिरण्याचा प्लान ठरवा

Updated: Nov 29, 2019, 09:04 PM IST
रविवारी असा राहील रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक  title=

मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता रविवार १ डिसेंबर रोजी मध्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

कल्याण ते ठाणे सीएसएमटीच्या दिशेने जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यत परिणामी ब्लॉककाळात अप जलद मार्गावरील वाहतुक अप धिम्या मार्गावरुन धावणार परिणामी लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक १५ मिनिटे उशिराने धावणार आहे तर रविवारी ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यतच चालविण्यात येणार असून तेथूनच डाउन दिशेला रवाना होणार आहे.

हार्बर मार्ग मेगाब्लॉक

वडाळा रोड ते वाशी अप-डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१०  ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत परिणामी प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल विशेष लोकल धावणार आहे तर हार्बर प्रवाशांसाठी सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यत मेन लाईन, ट्रान्स हार्बरने प्रवाशांना मुभा राहील.

पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

शनिवारी ३० नोव्हेंबरला रात्रीकालीन ब्लॉक राहील. वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रात्री ११.५० ते मध्यरात्री २.५० वाजेपर्यत अप जलद मार्गावर तर रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यत डाउन जलद मार्गावर ब्लॉकची कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान अप-डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार तर ६९१४९ मेमू रविवारी पहाटे ४.४० वाजता सुटेल.

शनिवारी रात्रीपासून काम सुरू

३० नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्री कुर्ला स्थानकात ब्लॉककुर्ला स्थानकातील पादचारी पुलाचा गर्डर काढण्याचे काम करण्यासाठी रात्री मुख्य मार्गवरील अप जलद मार्गावर तर हार्बर मार्गाच्या डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री ११.५० ते रविवारी पहाटे ४.५० वाजेपर्यत काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल अप मार्गावरी वाहतूक रात्री ९.१६ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यत आणि डाउन मार्गावरील लोकल गाड्या रात्री ११.१४ ते पहाटे ०५.०६ वाजेपर्यत पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच रात्री १०.१९ आणि रात्री ११.१३ ची पनवेल-सीएसएमटी लोकल कुर्ला आणि मानखुर्द स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. मेन लाईनवर अप जलद मार्गावरील वाहतूक रात्री ११.२० नंतर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावरुन धावणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी हार्बर मार्गाच्या ठाणे-वाशी, नेरुळ मार्गावरुन प्रवास करु शकतात. याशिवाय मुंबईत येणाऱ्या अप मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या रात्री ११.२० नंतर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.