आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Dec 3, 2017, 09:00 AM IST
 आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक  title=

मुंबई : मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यात मध्य रेल्वेवर नियमित ब्लॉकप्रमाणेच नेरळ येथे पादचारी पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या गर्डरसाठीही वेगळा ब्लॉक घेतला जाणार आहे. 

मेल-एक्सप्रेस मार्गात बदल

 मध्य रेल्वेवर नेरळ येथे पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबईत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात देखील बदल केला आहे.

निर्धारित वेळेपेक्षा उशीरा 

 हैद्राबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस, कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे मुंबईत येईल.

या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

या गाड्यांमधील कल्याणपुढील प्रवाशांच्या सुविधेसाठी दिवा स्थानकात या गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.