Shocking News : 'या' मराठमोळ्या कलाकारानं चोरल्या तब्बल 22 बाईक, असा झाला उलगडा...

Shocking News : प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो. या कलाकावर अशी काय वेळ आली की त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं?   

Updated: Feb 10, 2023, 11:49 AM IST
Shocking News : 'या' मराठमोळ्या कलाकारानं चोरल्या तब्बल 22 बाईक, असा झाला उलगडा...
marathi tv serial balumama fame co star sunil Chaudhary stole 22 bike latest news

Shocking News : कलाकार सहसा प्रेक्षकांचं मनोरंजन करून प्रसिद्धीझोतात येतात. पण, एका मराठी कलाकारानं मात्र भलत्याच कारणामुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. कारण या अभिनेत्यानं म्हणे चोरी केली आहे. छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये सहकलाकारचे काम करणाऱ्या एका कलाकाराने केलेल्या कृत्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, या अभिनेत्यानं तब्बल 22 बाईक चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुभाष चौधरी (वय 28) असं त्या अभिनेत्याचं नाव असून तो बदलापूरचा राहणारा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

कोविड काळात आर्थिक अडचणीपोटी उचललं हे पाऊल 

कोविड काळात चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण मोठ्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. याचा फटका सुनीललाही बसला. पैशांची चणचण भासल्यामुळं त्यानं मुंबईसह आजुबाजूच्या परिसरातून त्यानं बाईक चोरण्यास सुरुवात केली. निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी तो चोरायचा आणि जळगाव परिसरात साधारण 10 ते 15 हजार रुपयांना विचकायचा.  

कसा झाला चोरीचा उलगडा? 

सुनीलचं हे कृत्य तेव्हा उघडकीस आलं जेव्हा मुलुंडमधील गव्हाणपाडा परिसरात राहणाऱ्या अरविंद उकर्डे यांची बाईक चोरीला गेली. सदर प्रकरणांवर नवघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश सानप यांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक नेमलं. 

Business News : गौतम अदानींसारखेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला 

 

पोलीस तपास सुरु झाला आणि त्यादरम्यानच काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यातूनच सुनील चौधरीचा ठावठिकाणा मिळाला. पोलिसांनी त्याला ठाणे परिसरातून ताब्यात घेतलं आणि यानंतरच्या चौकशीमध्ये त्यानं आपण 22 बाईक चोरल्याचा गुन्हा कबूल केला.