मराठा मोर्च्यात गर्दीतूनही अवघ्या मिनिटात अ‍ॅम्युलन्सला करून दिली मोकळी वाट

मराठा क्रांती मूक मोर्च्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं आज मुंबईत पोहचले आहे. मोर्च्येकर्‍यांची संख्या पाहता गर्दी चा  रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज होता. यातूनच वाहतुक कोंडीदेखील होण्याची शक्यता होती. पण शिस्तबद्ध मोर्चा आणि वाहतुक पोलिसांची व्यवस्था याचा प्रत्यय आज मुंबईत आला. हजारोंच्या गर्दीतूनही काही क्षणांत अ‍ॅम्ब्युलन्स बाहेर पडली. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 9, 2017, 02:01 PM IST
मराठा मोर्च्यात गर्दीतूनही अवघ्या मिनिटात अ‍ॅम्युलन्सला करून दिली मोकळी वाट   title=

मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्च्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं आज मुंबईत पोहचले आहे.

मोर्च्येकर्‍यांची संख्या पाहता गर्दी चा  रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज होता. यातूनच वाहतुक कोंडीदेखील होण्याची शक्यता होती. पण शिस्तबद्ध मोर्चा आणि वाहतुक पोलिसांची व्यवस्था याचा प्रत्यय आज मुंबईत आला. हजारोंच्या गर्दीतूनही काही क्षणांत अ‍ॅम्ब्युलन्स बाहेर पडली. 

 सकाळी 11 वाजता भायखळा येथील उड्डाण पूलावरून मराठा मोर्चेकर्‍यांनी आझाद मैदानाकडे जाण्यास सुरवात केली.  हजारो मोर्चेकरी उड्डाणपूलाखाली होते. पण या गर्दीतूनही पूलाच्या खालच्या रस्स्त्याने जेजे  कडे जाणार्‍या अ‍ॅम्युलन्सला मोर्चेकर्‍यांनी अवघ्या काही मिनिटांत वाट मोकळी करून दिली. 

 

आपल्या मागण्यांसाठी लढाई करतानाही कोणाला त्रास होऊ नये याकरिता मराठा क्रांती मोर्च्याचे स्वयंसेवक विशेष काळजी घेताना दिसत आहेत.