मुंबई आयआयटीतले मनोहर पर्रिकरांचे ५ वर्ष

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळं आयआयटीच्या आजी-माजी विध्यार्थ्यांमध्येही शोककळा परसरली आहे.

Updated: Mar 18, 2019, 05:10 PM IST
मुंबई आयआयटीतले मनोहर पर्रिकरांचे ५ वर्ष title=

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळं आयआयटीच्या आजी-माजी विध्यार्थ्यांमध्येही शोककळा परसरली आहे. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं मार्गदर्शन आजी-माजी विद्यार्थ्यांना फार मोलाचं ठरले आहे. अशी प्रतिक्रिया आयआयटीचे माजी विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

मनोहर पर्रिकर हे मुंबई आयआयटीचे विद्यार्थी होते. तिथं शिकत असताना ते आयआयटीच्या हॉस्टेल क्रमांक ४ मधील १६६ क्रमांकाच्या खोलीत वास्तव्याला होते. जवळपास पाच वर्ष ते या होस्टेलमध्ये राहिले. दहा बाय दहाच्या त्यांच्या होस्टेलच्या खोलीतले अनेक किस्से अजून विद्यार्थ्यांमध्ये चर्चिले जातात.