मनोहर पर्रिकर वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत दाखल झालेत. मात्र गरज पडल्यास ते उपचारांसाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 6, 2018, 09:40 AM IST
मनोहर पर्रिकर वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत दाखल title=

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत दाखल झालेत. मात्र गरज पडल्यास ते उपचारांसाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत येण्यापूर्वी पर्रिकरांनी दोना पावला इथल्या आपल्या निवासस्थानी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन कॅबिनेट सल्लागार समितीची स्थापना केली. याआधी स्वादुपिंडाच्या विकारामुळे पर्रिकरांना मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 22 फेब्रुवारीला गोव्याला परत जात त्यांनी राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला.