रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण जीव वाचला

सीसीटीव्हीत ही सगळी घटना चित्रित झाली आहे.

Updated: Feb 5, 2020, 01:53 PM IST
रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण जीव वाचला title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्टेशनवर एका प्रवाशाने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेखाली उडी मारली. मात्र, प्रत्यक्षात त्याचा जीव वाचला. सीसीटीव्हीत ही सगळी घटना चित्रित झाली आहे. २ फेब्रुवारीची ही घटना आहे. ट्रेन आली, ट्रेन स्टेशनवर थांबली, आणि काही वेळाने निघून गेली. मात्र, हा तरुण फक्त किरकोळ जखमी झाला आहे.

या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अजून समोर आलेलं नाही. पण सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे.