छेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा

मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती. 

Updated: Aug 18, 2017, 01:24 PM IST
छेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा  title=

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती. 

अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओ, लिंक रोडवरुन एक महिला काम संपवून रिक्षाने घरी जात असताना एका बाइकस्वाराने तिचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरुणीचं प्रसंगावधान

पीड़ित महिला रिक्षातून रात्रीच्या वेळेस कामावरून घरी जात असताना अंधेरीतील लिंक रोडवर दुचाकीवरुन दोन तरूण रिक्षाचा पाठलाग करत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आलं... 

या तरुणीने तत्काळ बाइकस्वार तरुणाचे फोटो काढून ट्वीटरच्या सहाय्याने मुंबई पोलिसांना पाठविले. तत्काळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीऱ दखल घेत पीड़ित मुलीला संपर्क करून तीचे ठिकाण जाणून घेऊन पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या बाइकस्वारांना अटक केली.

तरुणीचा रिक्षातून पाठलाग करणारे दोन तरूण रिक्षात बसलेल्या तरुणीला अश्लील हावभाव करत होते. अखेर या तरुणीने खबरदारी म्हणून तत्काळ तरुणाचे फोटो काढून पोलिसांना पाठवले. आंबोली पोलिसांनी विलंब न करता या दोन तरुणांना अटक केली.

यासाठी मुंबई पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक होतंय. पोलिसांनीही महिलांना अशा प्रसंगांना धैर्यानं तोंड देत पोलिसांत तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलंय.