MH Police | राज्यातील महिला पोलिसांना 'प्रायोगिक' दिलासा; कामाच्या वेळेबाबत मोठा निर्णय

Maharashtra woman Police/Cops working hour : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 29, 2022, 08:50 AM IST
MH Police | राज्यातील महिला पोलिसांना 'प्रायोगिक' दिलासा; कामाच्या वेळेबाबत मोठा निर्णय title=

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांसाठी कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांवर करण्यात आली आहे. 

अनेक वर्षापासून महिला पोलिसांची कामाची वेळ कमी करण्याची मागणी होत होती. परंतू आता त्यावर निर्णय झाला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाची वेळ कमी करण्यात आली आहे. 

यामुळे महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कुटूंबाला अधिक वेळ देता येणार आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांची करण्यात आली आहे. 

कामाच्या 8 तासांचा निर्णय प्रायोगिक तत्वावर असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.

राज्यात प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.