मुंबई : राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितू सूत्रांनी दिली आहे. चाकणकरांना फोनद्वारे ही धमकी दिल्याचं समजतंय. ही धमकी अहमदनगरमधील व्यक्तीने दिल्याचं म्हटलं जातंय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. (maharashtra state women commission chairperson rupali chakankar received death threat source information)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात आज दुपारच्या सुमारास अज्ञाताने फोन केला. अज्ञाताने चाकणकरांना पुढील 24 तासात मारणार असल्याचा हा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जातंय. फोन करणारी व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचं म्हटलं जातंय. या अज्ञात व्यक्तीने धमकी का दिली याचं कारण अस्पष्ट आहे. सुरक्षा यंत्रणांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास केला जात आहे. या धमकीमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान रुपाली चाकणकर यांना धमकी मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही रुपाली चाकणकर यांना दोनदा फोनद्वारे धमकी मिळाली होती. याआधी 25 डिसेंबर 2022 रोजी एका व्यक्तीनं कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती.