मुंबई : राज्य सरकारने (Mahavikas Aaghadi) नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला (New Mumbai Airport) दि बा पाटील (D B Patil) यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आगरी-कोळी समाजाची या विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची आग्रही मागणी होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उशिरा का होईना पण भूमिपुत्रांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. तसेच भूमिपुत्रांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. (maharashtra state cabinet approval to rename new mumbai international airport as the late db patil airport)
मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचच नाव देण्याचे एकमताने ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात याबाबत मंजुरी मिळण्याची औपचारिकता बाकी होती. अखेर मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान महाविकास आघाडीने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरालाही ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद हे शहर संभाजीनगर नावाने ओळखले जाणार आहे. तर उस्मानाबादच्या धाराशीव या नामांतराला मान्यता मिळाली आहे.