Shiv Sena Symbol : शिवसेना शिंदे गटाची की ठाकरे गटाची? मंगळवारी अंतिम फैसला?

Shiv Sena Symbol : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मंगळवारी फैसला होणार, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निवडणुक आयोग देणार निकाल

Updated: Jan 17, 2023, 10:26 AM IST
Shiv Sena Symbol : शिवसेना शिंदे गटाची की ठाकरे गटाची? मंगळवारी अंतिम फैसला? title=

Election Commission Hearing on Shiv Sena Symbol : शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) कुणाचं याचा सुप्रीम फैसला 17 जानेवारीला म्हणजे मंगळवारी होऊ शकतो. धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेना नाव कुणाचं यावर निवडणूक आयोग अंतिम फैसला सुनावण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असा दावा केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावलं. आता निवडणूक आयोग अंतिम निर्णय देऊन प्रकरण निकालात काढण्याची शक्यता आहे. 

कोणत्या निकषांवर निकाल? 

Shiv Sena Symbol : Election commission hears Uddhav Thackery and Eknath Shinde on Shiv Sena symbol issue Final Verdict Toda

Shiv Sena symbol - Election commission Hearing  Hearing today on Dhanushyaban Signs

Shiv Sena symbol - Election commission Hearing  Hearing today on Dhanushyaban Signs

Shiv Sena symbol - Election commission Hearing  Hearing today on Dhanushyaban Signs

Shiv Sena symbol - Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Shiv Sena symbol - Eknath Shinde vs Uddhav Thackeray

कुणाकडे किती आमदार

शिंदे गटाकडे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. तर ठाकरे गटाकडे (Thackeray Group) 14 आमदार आणि 7 खासदार आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे 12 आणि राज्यसभेचे तीन खासदारही ठाकरेंसोबत आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात आतापर्यंत सर्व युक्तीवाद पूर्ण झाला असून कागदपत्रही कोर्टात जमा झाली आहेत.  मंगळवारी म्हणजे 17 जानेवारीला धनुष्यबाण चिन्हा कोणाला मिळणार आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय सुनावला जाईल. सध्यातरी शिंदे गटाचं पारडं जड आहे. यासाठी सादिक अली केसचा संदर्भ देण्यात आला आहे. आमदार आणि खासदार ज्याच्याकडे जास्त त्यांच्या कडे पक्ष अशाप्रकारची भूमिका मांडण्यात आली आहे. 

कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि किती पदाधिकारी आहेत याचा अभ्यास करुनच निवडणूक आयोग निर्णय देत असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय. त्यामुळे शिवसेना कोणाची हा निर्णयही आकड्यांच्या खेळावरच अवलंबून असेल. त्यामुळेच धनुष्यबाण कुणाचा.. शिंदेंचा की ठाकरेंचा या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलंय.