राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारत असतात; अमृता फडणवीस यांचा अजित पवार यांना टोला

Maharashtra Politics : राजकीय नेत्यांची खूप लोकांशी जवळीक असते, ते खूप ठिकाणी डोळे मारतात, असं विधान अमृता फडणवीसांनी केलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय.अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात किती मैत्री किती हे त्या दोघांनाच माहिती असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या. 

Updated: Apr 22, 2023, 10:39 PM IST
राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारत असतात; अमृता फडणवीस यांचा अजित पवार यांना टोला title=

Amruta Fadnavis Vs Ajit Pawar : राजकीय भूकंपाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. यानंतर यावर जाहीर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरची चर्चा काही थांबलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रपिया दिली आहे.  राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारत असतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खरोखरच कितपत मैत्री आहे? या प्रश्नावर उत्तर देताना  अमृता फडणवीस या टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री व्हायला आवडेल

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलखुलास दादा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बिनधास्तपणे आपली मतं मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदावर दावा कायम असल्यापासून ते आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं सांगत वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार उत्तर दिली होती. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला कोणीही राज्याचा मुख्यमंत्री झालेला आवडेल. पण जो कोणी असेल त्याने झोकून देऊन काम केलं पाहिजे असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

राजकीय नेत्यांची खूप लोकांशी जवळीक असते, ते खूप ठिकाणी डोळे मारतात, असं विधान अमृता फडणवीसांनी केलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय.अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात किती मैत्री किती हे त्या दोघांनाच माहिती असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या. 

अजित पवारांचा डोळा मरातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

अजित पवारांच्या एका व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू असताना शेजारी उभ्या असलेल्या अजित पवारांनी डोळा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. शिंदे-फडणवीस सरकारनं आपला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांची पत्रकार परिषद झाली. अजित पवारांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्याठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झाले. ठाकरे पत्रकारांना संबोधित करत असताना अजितदादांनी अचानकपणे डोळा मारला. 
विशेष म्हणजे याच पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंशी बोलताना अजिदादांच्या हातातून काहीतरी पडलं त्यानंतर त्यांनी जीभ चावली. दादांच्या या व्हिडिओचीही चर्चा झाली होती. आक्रमक विरोधी पक्षनेते अशी अजितदादांची ओळख आहे. मात्र अजितदादांचा हा मिश्किल अंदाज सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता.