शिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका

या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे

Updated: Jun 27, 2022, 09:15 AM IST
शिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका  title=
Maharashtra Political Crisis eknath shinde shivsena saamana editorial sanjay raut

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये शिवसेनेला दणका देत एकनाथ शिंदे आणि जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केली. सत्ताधाऱ्यांसाठी हा मोठा हादरा होता. सदर घटनेवर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. पण, आता मात्र या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. (Maharashtra Political Crisis eknath shinde shivsena saamana editorial sanjay raut)

संजय राऊत यांनीही जळजळीत शब्दांमध्ये या आमदारांची कानउघडणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या वर्तमानपत्रात याचेच पडसाद उमटल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्य़ारी यांनी रुग्णालयातून माघारी आल्यानंतर बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितता देण्याची मागणी करणारं पत्र पोलीस आयुक्तांना लिहिलं. तिथे केंद्राकडूनही आमदारांच्या सुरक्षिततेची मागणी केंद्रस्थानी आणण्यात आली. 

केंद्र सरकारवर अर्थात थेट भाजपवर टीका करत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेच्या वतीनं सुरक्षा देण्याचा हा निर्णय सुरक्षेचीच 'वायझेड' करणारा आहे अशा अभद्र शब्दांत टीका केली. यावेळी बंडखोरांचा उल्लेख इथं 'गद्दार नाचे' असा करण्यात आला आहे. 

केंद्राकडून 16 आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये करण्यात आलेल्या हस्तक्षेपाचा शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्या तालमीत सुरु झाल्याचं म्हणत याचे पुरावे समोर असल्याची जळजळीत टीका सामनातून करण्यात आली आहे.