सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Updated: Jul 4, 2022, 11:50 AM IST
सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'! title=

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले तर, महाविकास आघाडीच्या बाजूने 99 आमदारांनी मतदान केले.

बहुमत चाचणीनंतर राज्यात शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप युतीचे सरकारचे बहुमत असल्याचे सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडीने आपले बहुमत गमावले आहे. 

शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी शिंदे गटासोबत 40 आमदार गेल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकून सत्तेवर शिक्कामोर्तब केला आहे.