Uddhav Thackeray : निष्ठावंतांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thakceray) यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेल 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) सोडला आहे.

Updated: Jun 22, 2022, 10:30 PM IST
 Uddhav Thackeray : निष्ठावंतांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडलं title=

मुंबई :  राज्यातील राजकीय नाट्य सुरुच आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात जमा झाले आहे. या राजकीय घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thakceray) यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेल 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) सोडला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे कुटुंबिय मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. (maharashtra political crisis cm uddhav thackeray left varsha bungalow after eknath shinde controversy)

वर्षावरुन परतताना मुख्यमंत्री त्यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सोबत निघाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळी नाक्याला पोहचताच त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. मार्कंडेश्वर मंदिराजवळ शिवसैनिकांनी उद्धव  ठाकरेंच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाथ ठिकठिकाणी घोषणा देण्यात येत आहेत. तसेच मातोश्रीबाहेर अनेक शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.