बंडखोरीमुळे 8 जणांची मंत्रिपदं धोक्यात, 3 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांची हकालपट्टी?

गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक, रणनीती ठरवणार

Updated: Jun 26, 2022, 09:03 AM IST
बंडखोरीमुळे 8 जणांची मंत्रिपदं धोक्यात, 3 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांची हकालपट्टी? title=

Maharashtra Political Crisis : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केल्यानंतर आता त्यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेचे (Shivsena) 41 आणि चार-पाच अपक्ष आमदार त्यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत. यातील 8 बंडखोरांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न असतानाही राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे तब्बल आठ मंत्री मागील पाच दिवसांपासून गुवाहाटीत आहेत. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही ते अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची आता हकालपट्टी निश्चित मानली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

कोणाची मंत्रिपदे धोक्यात आहेत पाहुयात...
एकनाथ शिंदे (नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री), गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री), दादा भुसे (कृषी मंत्री), संदीपान भूमरे (रोहयो व फलोत्पादन मंत्री), बच्चू कडू (जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री), अब्दुल सत्तार (महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री) व शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री), राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री) हे कॅबिनेट आणि राज्यमंत्री पक्षाविरूध्द बंडखोरी करून गुवाहाटीत आहेत.

शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक
दरम्यान, गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक असल्याची माहिती मिळतेय.  या बैठकीत शिंदे समर्थकांची पुढील रणनीती ठरणार आहे. तसंच निलंबनाच्या नोटीसीबाबत आज उत्तर देण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीतला मुक्काम वाढला
गुवाहटीमधल्या हॉटेल रॅडिसनमध्ये शिंदे समर्थकांचा मुक्काम वाढलाय. 30 तारखेपर्यंतचं आमदारांचं बुकिंग वाढवण्यात आल्याचं समजतंय कायदेशीर लढाई, उपाध्यक्षांवरचा अविश्वास ठराव, इतर पक्षांसोबत चर्चा याला वेळ लागणार असल्यानं बंडखोर 30 तारखेपर्यंत आमदार गुवाहाटीमध्येच थांबणार आहेत.