Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी

पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Aug 24, 2022, 07:44 PM IST
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी title=

मुंबई : पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी बातमी समोर आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भरतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात  लवकरच 14 हजार जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचं फडणवीस यांनी विधानभवनात सांगितलं. (maharashtra police recruitment for 14 thousand posts in state home minister devendra fadnavis gave information)

फडणवीस काय म्हणाले?

राज्यात 14 हजार जागांसाठी पोलीस भरती होईल. तसेच सध्या 7 हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील काळात आणखी 7 हजार जागांवर पोलीस भरती केल जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी पोलीस भरतीबाबत पश्न विचारला. यावर फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.