राज्यपालांना अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रिपब्लिक मीडिया

Updated: Nov 9, 2020, 01:51 PM IST
राज्यपालांना अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.

राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.

अर्णब गोस्वामी यांना तळोजा जेलला कालच हलवण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार राम कदम यांनी आपण अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी जेलमध्ये जाणार आहोत, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान देखील दिलं आहे. तसेच अर्णब गोस्वामी यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी या देशातील जनता हे सहन करणार नाही, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.