सरकार vs राज्यपाल असा संघर्ष मिटला, अखेर MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर स्वाक्षरी

MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर (MPSC member appointment file) अखेर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी स्वाक्षरी केली  

Updated: Aug 5, 2021, 07:16 AM IST
सरकार vs राज्यपाल असा संघर्ष मिटला, अखेर MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर स्वाक्षरी title=

मुंबई : MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर (MPSC member appointment file) अखेर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी स्वाक्षरी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government) पाठवलेल्या 4 सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे MPSCच्या तब्बल 20 हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, नव्या सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकार आज जारी करणार आहे. राज्यपालांनी सदस्य नियुक्तीच्या फाईलवर दोन दिवस काहीच कार्यवाही न केल्याने सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष रंगला होता. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी संध्याकाळी राज भवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी फाईल क्लिअर केली.

MPSC परीक्षेचा अखेर मुहूर्त ठरला 

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता सरकारने या परीक्षांची घोषणा केली असून आता 4 सप्टेंबरला या परीक्षा (MPSC Exam 2021) होणार आहेत. 

महाराष्ट्रातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची वाट पहात होते. 2020 मध्ये होणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा 6 वेळेस पुढे ढकलली होती. 806 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. PSI/ STI/ASO या पदांसाठी ही परीक्षा होत आहे. परीक्षा रद्द किंवा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना होती. त्या विरोधात पुणे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनं झाली होती.

कोणत्या पदासाठी किती जागा 

सहाय्यक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा
एकूण - 806 जागा