जबरदस्त! आता Online Banking सारखी सुविधा देणार WhatsApp

ऑनलाईन बँकिंगमुळे (Online Banking) बहुमूल्य वेळेची बचत होतेय. अनेक खातेधारक हे  Online Bankingलाच प्राधान्य देतात.  

Updated: Aug 4, 2021, 09:51 PM IST
जबरदस्त! आता Online Banking सारखी सुविधा देणार WhatsApp title=

मुंबई : धावपळीच्या आयुष्यात ऑनलाईन बँकिंगमुळे (Online Banking) बहुमूल्य वेळेची बचत होतेय.  Online Banking या पर्यायाला अनेकांची पसंतीही मिळतेय. अनेक खातेधारक हे  Online Bankingलाच प्राधान्य देतात.  Online Banking मुळे लहानात लहान कामकाज नेट बँकिगद्वारे केलं जातंय. जर तुम्हाला कोणी सांगितलं की जर आता नेट बँकिंगनंतर WhatsApp वरुन बँक अकाउंट ऑपरेट करता येईल, तुमची प्रतिक्रिया काय असेल? पण आता WhatsApp Banking हा पर्याय आयसीआयसीआय (ICICI Bank on WhatsApp) बँकेने दिलाय. जर तुमचंही आयसीआयसीआय बँकेत खातं आहे, आणि तुम्हालाही WhatsApp Banking वापरायचंय तर केवळ एक मेसेज करावा लागणार आहे. (icici bank is now provide whstapp banking service for account holders know details)

WhatsApp सर्विससाठी काय करावं लागेल? 

WhatsApp Banking पर्याय सुरु करण्यासाठी आयसीआयसीआय खातोधारकांना 8640086400 या नंबरवर HI करावं लागेल. तसेच याच नंबरवर  मिस्ड कॉलही देता येईल. सोबतच  9542000030 या नंबरवर OPTIN असा मेसेज टाईप करुन एसएमएसही पाठवता येईल. यानंतर तुम्हाला आयसीआयसीकडून व्हॉट्सअॅपवर देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली जाईल. या यादीतून तुम्हाला प्राधान्याने हव्या असलेल्या सेवांची निवड करावी लागेल. 

बँकेकडून WhatsAppवर देण्यात येणाऱ्या सेवा 

अकाउंट बॅलेन्स
लास्ट 3 ट्रांज्क्शन
क्रेडिट कार्ड लिमीट
ब्लॉक आणि ब्लॉक कार्ड
इंस्टेंट लोन
इंस्टासेव
फिक्स्ड डिपॉजिट
बिल पेमेंट
ट्रेड सर्विस  

WhatsApp बँकिंगचे फायदे

- कधीही आणि केव्हाही WhatsApp बँकिंग पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे कधीही व्यवहार करता येतो. विशेष म्हणजे नॉन  ICICI  खातेधारकही ऑफर्स, बँक एटीएम आणि शाखेचा फायदा घेऊ शकतात.

- कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करण्याची सुविधा