राज्य सरकारला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर

सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करत आहे.

Updated: Jan 5, 2019, 03:46 PM IST
राज्य सरकारला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर title=

मुंबई: फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा विसर पडल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या नववर्ष दिनदर्शिकेत डॉ. आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन आणि २८ नोव्हेंबरच्या महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेय. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून नुकतीच नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केलीय. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये १ डिसेंबरला जागतिक एडस प्रतिबंधक दिन, २ डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन आणि ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचा उल्लेख आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कोणताही उल्लेख नाही. यावरुन फडणवीस सरकारला टीकेचा सामना करावा लागणार आहे. सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.