Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

महाराष्ट्रात  कोरोनाच्या (Corona) सक्रीय रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

Updated: Dec 27, 2021, 09:14 PM IST
Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती? title=

मुंबई : शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्णही कमी मात्रा सातत्याने आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनही सतर्क झालं आहे. (Maharashtra corona update today 27 December 2021 1 thousand 426 cases of corona virus and 26 cases of omicron found in state)

राज्यात सक्रीय रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे रुग्णसंख्येत 6 दिवसांत तिपटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वाढवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिले आहेत. 

 
राज्यात दिवसभरात एकूण रुग्ण किती? 

राज्यात आज एकूण 1 हजार 426 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईतही 800 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मुंबईत आज एकूण 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच  राज्यात ओमायक्रॉनचे  26 रूग्णांचं निदान झालं आहे. 

मुंबईत कोरोना, महापालिका सजग 

मुंबईत कोरोनाचा वाढता आकडा पाहता पालिका प्रशासन सावध झाली आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी  महत्त्वाची बैठक घेतली.

या बैठकीत चहल यांनी कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सजग आणि सतर्क राहण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. 

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांवेळी उपचार केंद्रांसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागा आणि रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती अपडेट करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. 

लसीकरणाचा वेग वाढवा- मुख्यमंत्री

राज्यात गेल्या 20 दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये 50% वाढ झाली आहे. तर गेल्या 6 दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळांच्या  बैठकीत देण्यात आली. 

तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.