Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या 2 हजार पार

Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दररोज सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय. 

Updated: Jun 8, 2022, 07:18 PM IST
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या 2 हजार पार title=

मुंबई :  दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललाय. राज्यात 2 आठवड्यांपूर्वी नियंत्रणात असलेल्या (Maharashtra Corona Update) कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दररोज सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय. (maharashtra corona update 8 june 2022 today 2 thousand 701 positive patients found in state know positivity rate)

राज्यात आज गेल्या 24 तासांमध्ये अडीच हजार पार पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच निर्बंध लागू  होण्याची शक्यता आहे. 

राज्यात दिवसभरात एकूण 2 हजार 701 जणांना कोरोना झाला आहे. सुदैवाने आज एकही मृताची नोंद झालेली नाही. तर 24 तासांमध्ये 1 हजार 327 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

सक्रीय रुग्ण किती? 

दरम्यान राज्यात आज सरकारी आकडेवारीनुसार 9 हजार 806 रुग्णांवर कोरोना उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी 

बुधवार 8 जून :  2 हजार 701 

मंगळवार 7 जून : 1 हजार 881 

सोमवार 6 जून :  1 हजार 36  

रविवार 5 जून : 1 हजार 494

शनिवार 4 जून :  1 हजार 357

शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 

गुरुवार 2 जून : 1 हजार 45

बुधवार 1 जून : 1 हजार 81