Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फडणवीस यांनी पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी भेटची वेळ मागितली तर मी देईन आणि त्यांना भेटणार, असे स्पष्ट सांगितले. (Maharashtra Politics News)
राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला
संजय राऊत (Sanjay Raut) आज सांगितले की, जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात कटुता वाढली आहे, ती कमी करण्याची गरज असल्याचे बोलले होते. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करतो. त्याचवेळी राऊत म्हणाले, मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही प्रतिसाद आला आहे. तुम्ही संजय राऊत यांना भेटणार का, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी सांगितले की, मी सगळ्यांना भेटतो. राऊत यांनी भेट मागितली तर त्यांच्याही भेट घेईल.
संजय राऊत म्हणाले, 'हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही'
गोरगाव येथील पत्राचाळ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल जामिनावर जेलबाहेर आलेत. यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले होते.
संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय. राजकारणातील कटुता संपवली पाहिजे फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचं राऊतांनी कौतुक केलंय. फडणवीसांची भेट घेणार अशी माहिती राऊतांनी दिलीय.#SanjayRaut #Devendrafadnavis #MarathiNewshttps://t.co/dNmVe4Yj3x pic.twitter.com/cHaPXJdStP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 10, 2022
राज्यात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून जेलमध्ये होतो आणि आता बाहेर आलोय. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे, असे राऊत म्हणाले होते.