Sanjay Raut on Raj Thackeray's criticizes : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये सागितले होते की, संजय राऊत यांना लवकरच अटक होणार आहे. त्यांनी एकांतात राहण्याची प्रॅक्टीस करावी. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत म्हणाले, 'हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही'
मला राज ठाकरे यांना सांगायचे आहे, सावरकरही तुरुंगात होते. लोकमान्य टिळकही तुरुंगात होते. आणीबाणीत अनेकांना अटक केली. मात्र, मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे मत आहे. मी जेलमध्ये होतो. तुरुंगात मी एकांतात होतो. मी एक सांगतो, राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भात तुरुंगात जाण्याच्या भावना व्यक्त करु नये. आता तुरुंगातील एकांतातील वेळ सत्कारणी लावणार आहे, असा टोला राऊत आंनी राज ठाकरे यांना लगावला. दरम्यान, तीन महिन्यांच्या दिवसांचा अनुभव इतक्या लवकर सांगण्यासारखा नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.
सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्यासाठी त्यांचे स्वागत करतो. राज्यासाठी आणि देशासाठी चांगल्या गोष्टींचे स्वागत केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. त्यांच्याकडून अनेक चांगले निर्णय ऐकायला मिळत आहेत. गरीबांना घरे देण्याचा निर्णय तसेच म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय आमच्या सरकारने काढून घेतले होते, ते पुन्हा देण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला. त्यामुळे सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राज्याचा कारभार उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. माझे सरकारी काम त्यांच्या विभागाशी येते. त्यामुळे दोन तीन दिवसांत उपमुख्यंत्री फडणवीस यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. तो राज्याचा असतो. तसे पंतप्रधान हा देशाचा असतो. मी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेणार आहे. भेट घेणार म्हणून नरमाईची भूमिका घेतली असं होत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.