Mumbai Omicron Fear | मुंबईकर सावधान! रुग्णवाढीमुळे महापालिका चिंतेत, राज्यातील कोरोनाचा आकडा 800 च्या जवळपास

 कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Varient) सापडल्यारपासून जगभराची चिंता पुन्हा वाढली आहे.  

Updated: Dec 3, 2021, 08:08 PM IST
Mumbai Omicron Fear | मुंबईकर सावधान! रुग्णवाढीमुळे महापालिका चिंतेत, राज्यातील कोरोनाचा आकडा 800 च्या जवळपास   title=

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Varient) सापडल्यारपासून जगभराची चिंता पुन्हा वाढली आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण सापडले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात (Karnatka) कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचीही (Maharashtra) चिंता वाढील लागली आहे. सुदैवाने राज्यात अजूनही नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र काल 2 डिसेंबरला राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे मुंबईच्या (Mumbai) चिंतेत वाढ झाली आहे. (Maharashtra 796 people found tested corona positive on 2 December 2021) 

राज्यात 2 डिसेंबरला 796 रुग्णांचं निदान झालं. थोडक्यात राज्यात 2 डिसेंबरला कोरोनाचा आकडा हा 800 च्या पास पोहचला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकाही (BMC) सतर्क झाली आहे. मुंबई हे राज्यातील पर्यायने देशातील महत्त्वाचं आर्थिक केंद्र आहे. पहिल्या दोन्ही लाटेत मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. त्यामुळे आता महापालिकेने या नव्या व्हारसला रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. तसेच या नव्या पाहुण्याला रोखण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.