Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार?

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत.  

Updated: Dec 17, 2022, 10:13 AM IST
Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार? title=

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. (Maharashtra Political News) महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत. (Maharashtra News in Marathi) महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी याची उत्सुकता आहे. 

Maha Vikas Aghadi Morcha LIVE Updates : महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी?

मोर्चाच्यानिमित्ताने महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. यामोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा सकाळी अकरा वाजता भायखळा येथून सुरु होईल. त्यानंतर जिजामाता उद्याने मोहम्मद अली रोड ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीपर्यंत ( सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर ) हा मोर्चा असेल. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीसमोर सभेच आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात किमान एका लाख कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

मोर्चात कोण सहभागी होणार आहे?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर, राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील सहभागी होणार आहे. डावे पक्ष सुद्धा मोर्चात सहभागी होतील. मात्र, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण काही कारणास्तव मोर्चात सहभागी होणार नाही आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार आहेत. 

तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी

 महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.   महाविकास आघाडीच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत अडीच हजार पोलीस बंदोबस्त होणार तैनात करण्यात आलेत.  मुंबई पोलीस सज्ज आहेत. 317 अधिकारी आणि 1870 कर्मचारी तैनात आलेत.  मविआचे प्रमुख नेते 12 वाजेपर्यंत मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हरवरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यताय. महापुरुषांचा अवमान करणा-यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा होणार आहे.

मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग असे असणार  

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल - डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग - ऑपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल - नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या मार्गाचासुद्ध वापर करावा.

- भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल-  नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 

- लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता बावला कम्पाउंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा. 

- मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.

- नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

- दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल मरिन ड्राइव्ह मार्ग याचा वापर करावा.

- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिककरिता पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्ग  इच्छितस्थळी जाऊ शकतात.

- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरिता मरिन ड्राइव्ह - ऑपेरा हाऊस - लिमॅंग्टन रोड - मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. महर्षी कर्वे रोड / मरिन ड्राइव्ह नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी किंवा डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.

- सीएसएमटी स्टेशनकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन- एल. टी. मार्ग चकाला डावे वळण जी.जे. जंक्शन दोन टाकी नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शनपुढे जाता येईल.