'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी... 

सायली पाटील | Updated: Jun 5, 2024, 11:55 AM IST
'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा title=
loksabha Election 2024 shivsena thackeray group to challange Mumbai north west constituency amol kirtikar ravindra waikar latest update

Loksabha Election 2024 Mumbai News : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election 2024 Results) नुकतेच हाती आहे. जिथं भाजपला बहुमत मिळवता आलं नसलं तरीही त्यांच्याकडे मताधिक्य असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, दुसरीकडे या नाण्याची आणखी एक बाजूच जास्त चकाकली. निमित्त ठरलं ते म्हणजे I.N.D.I.A आघाडीवर मतदारांनी दाखवलेला विश्वास. (Loksabha elction mumbai results) मुंबई आणि महाराष्ट्रात महायुती सरकारला मतदारांनी दणका देत महाविकासआघाडीला नव्यानं एक संधी देत त्यांच्या उमेदवारांना कौल दिला. 

पण, निवडणुकीचे हे निकाल सर्वच मतदारसंघांमध्ये शांततेत लागले असं मात्र म्हणता येणार नाही. भाजपला धुळ चारणाऱ्या (Shivsena) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं लोकसभेच्या जागांवर मिळालेल्या समाधानकारक यशानंतर आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निकालासंदर्भात लक्षवेधी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कारण, या मतदार संघाच्या निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात (ravindra waikar, amol kirtikar) रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असतानाच फेर मतमोजणी घेण्यात आली. इथंच गणित बिघडलं आणि या मतदारसंघात कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. 

हेसुद्धा वाचा : धाकट्या पवारांचं नेमकं कुठं चुकलं? बारामतीच्या निकालांनंतर समोर आली 'ही' कारणं...

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालामध्ये फेरफार झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय असून, निकालाच्या दिवशी मुंबईत खुद्द उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येसुद्धा हा मुद्दा प्रकाशात आणला होता. ज्यानंतर आता या निकालाला  शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. या निकालासंदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींनासुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या निकालासंदर्भातील पुढची चाल काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राऊतांचा इशारा... 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर दुसऱ्याच दिवशी माध्यमांशी संवाद साधताना, संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. 'अमोल किर्तीकर यांचा विजय झाला. मात्र त्यांचा विजय चोरला. वायकरांना ज्या पद्धतीने जिंकवलं त्याला मी चोरीचपाटी, पाकिटमारी बोलतो. तुमच्या हातात सत्ता आहे. पैसा आहे तर तुम्ही शिवसेनेची एक जागा पाकिटमारी करुन घेतली. ज्याला विजयी घोषित केलं. फेरमतमोजणीमध्ये विजयी घोषित केलं. त्यानंतर नाकारलेल्या मतांच्या आधारावर रायकरांना विजयी घोषित केलं. हा दरोडा आहे. त्याविरोधात आम्ही लढतोय' असं संजय राऊत म्हणाले. 

ज्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला, त्यांना सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी 25 टक्के जागा चोरलेल्या असून, रिटेनिंग ऑफिसरला त्याबाबतच जाब विचारला जाईल असा इशाराही दिला. दरम्यान, केंद्रात आमचं सरकार येणार, असा विश्वास त्यांनी पुन्हा बोलून दाखवला.